Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात 'iPhone' तयार होणार? ॲपलला आकर्षित करण्यासाठी शाहबाज शरीफ यांचा मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:02 IST

Apple Manufacturing in Pakistan: पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की अॅपल पाकिस्तानमध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. परंतु, सत्य काही वेगळेच असल्याचे समोर आले.

Apple Manufacturing in Pakistan : पाकिस्तानमध्ये ॲपल कंपनी आयफोनची निर्मिती सुरू करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र, पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या या वृत्ताची पडताळणी केली असता, यात पूर्ण सत्य नसल्याचे समोर आले आहे. ॲपल पाकिस्तानात नवे आयफोन बनवणार नसून, जुन्या आयफोनची दुरुस्ती करून ते पुन्हा निर्यात करण्यासाठी 'रिफर्बिशमेंट युनिट' स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

काय आहे नेमकी योजना?शहबाज शरीफ सरकार नवीन 'मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग फ्रेमवर्क' अंतर्गत ॲपलला पाकिस्तानात आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. या केंद्रात २ ते ३ वर्षे जुन्या आयफोनची दुरुस्ती केली जाईल आणि तेथून ते इतर देशांत निर्यात केले जातील. या प्रक्रियेत आयफोनमधील स्थानिक सुट्या भागांचा वापर १२ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला स्थानिक मनुष्यबळाला तांत्रिक प्रशिक्षण देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, जसा प्रयोग ॲपलने भारत, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये सुरुवातीच्या काळात केला होता.

ॲपलच्या अटी आणि सरकारचे सवलतींचे गाजर'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या रिपोर्टनुसार, ॲपलने पाकिस्तान सरकारसमोर तीन मुख्य मागण्या ठेवल्या होत्या. सवलतीच्या दरात जमिनीची उपलब्धता, ८ टक्के 'परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह' (कामगिरीवर आधारित आर्थिक लाभ) आणि जुन्या आयफोनच्या रिपेअरिंगसाठी अधिकृत परवानगी.

पाकिस्तान सरकार सध्या मोबाईल उत्पादकांना ६ टक्के सवलत देते. परंतु ॲपलसारख्या जागतिक कंपन्यांसाठी ती ८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव 'मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी २०२६-३३' मध्ये ठेवण्यात आला आहे.

वाचा - पगार पुरत नाही? मग आजच 'हा' ५०-३०-२० फॉर्म्युला वापरा; पैशांचे टेन्शन कायमचे मिटेल

अर्थव्यवस्थेला मिळणार का बळ?इंजिनीअरिंग डेव्हलपमेंट बोर्डाच्या मते, जर या रिफर्बिशमेंट प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तर पहिल्याच वर्षात पाकिस्तानला १०० दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे देशात परकीय चलन येईल आणि पाकिस्तानला प्रादेशिक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ओळख निर्माण करण्यास मदत होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan to refurbish iPhones, not manufacture; Shahbaz Sharif's plan.

Web Summary : Pakistan aims to attract Apple for iPhone refurbishment, not manufacturing. The plan involves repairing older iPhones for export, using local parts, and training local staff. Pakistan offers incentives like subsidized land and performance bonuses to Apple. This could generate $100 million in revenue.
टॅग्स :पाकिस्तानअॅपलस्मार्टफोनव्यवसाय